'या' 2 नियमित एक्स्प्रेसना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय

Edited by: विनायक गावस
Published on: August 23, 2023 15:26 PM
views 1407  views

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन या मार्गावरून धावणाऱ्या दोन नियमित एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.


याबाबत कोकण रेल्वेच्या माहितीनुसार, हापा - मडगाव एक्स्प्रेस (२२९०८) या गाडीला दि. २३ ऑगस्ट २०२३ च्या फेरीसाठी, तर मडगाव- हापा (२२९०७) या गाडीला दि. २५ ऑगस्टच्या फेरीकरिता स्लिपर श्रेणीतील प्रत्येकी एक जादा डबा जोडण्यात येणार आहे. याचबरोबर पोरबंदर- कोचुवेली (२०९१०) या गाडीला दि. २४ ऑगस्ट रोजीच्या फेरीसाठी तर कोचुवेली -पोरबंदर (२०९०९) या गाडीला दि. २७ ऑगस्ट रोजीच्या फेरीसाठी स्लिपर श्रेणीचा एक जादा कोच असेल. याचबरोबर नागरकोईल पनवेल (०६०७१) साप्ताहिक विशेष - गाडीच्या रोहा स्थानकातील वेळेत बदल करण्यात आला आहे. आधी ही गाडी रात्री ९ वा. ५० मिनिटांनी रोहा येथे येणार होती. मात्र, सुधारित वेळेनुसार ती रात्री ९ वा. ४० मिनिटांनी रोहा स्थानकावर येणार आहे. ओणम सणासाठी ही गाडी दि. २२ ऑगस्टपासन सरू झाली आहे.