
सावंतवाडी : ठाणे येथे जाण्यासाठी मळगाव रेल्वे स्टेशन येथे थांबलेल्या राम जयराम शेडगे (रा. ठाणे) यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचाराकरता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत राम शेडगे हे नातेवाईकांच्या लग्नासाठी बायकोसोबत सोनुर्ली येथे आले होते. आज ते पुन्हा ठाणे येथे जाण्यासाठी मळगाव रेल्वे स्टेशन येथे आले होते. मात्र, त्या ठिकाणी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने पत्नी प्राची शेडगे यांनी त्यांना उपचाराकरता नजीकच्या निरवडे प्राथमिक केंद्रामध्ये दाखल केले. मात्र, त्रास अधिक जाणवू लागल्याने त्यांना अधिक उपचाराकरता उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असता उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. याबाबत पत्नी प्राची शेडगे यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मृत मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.