तिथवली नाऊळ देववाडीतील रविंद्र कोकाटेंचा मृत्यू...!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 30, 2023 11:14 AM
views 165  views

वैभववाडी : तिथवली नाऊळदेववाडी येथील रविंद्र शंकर कोकाटे (वय-५०) यांचा घरातच मृत्यु झाला. काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार लक्षात आला.अतिदारू सेवनामुळे मृत्यु झाला असावा असा प्राथमीक अंदाज पोलीसांकडुन व्यक्त करण्यात आला.

तिथवली येथील श्री.कोकाटे हे २६ सप्टेंबर पासून घरी एकटेच राहत होते.त्यांची पत्नी  काही दिवसांपासुन माहेरी राहत होती.आज सकाळी ती घरी आली असता घराचा दरवाजा बंद होता.तिने हाक मारली परंतु आतुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे तीने शेजाऱ्यांना हा प्रकार सांगीतला.त्यानंतर पोलीस पाटीलांना बोलविण्यात आले.दरवाजा उघडल्यानंतर श्री.कोकाटे हे मृतावस्थेत दिसुन आले.त्यानंतर ही माहीती पोलीसांना देण्यात आली.पोलीसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

दरम्यान, कोकाटे यांना दारूचे व्यसन होते.काल सायकांळी सहा वाजण्याच्या सुमारास तेथील शेजाऱ्यांशी बोलले होते.त्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा बंद करून घेतला.आज सकाळी पत्नी घरी आल्यामुळे हा प्रकार तातडीने लक्षात आला.अति दारू पिण्यामुळे त्यांचा मृत्यु झाला असावा असा प्राथमीक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.त्यांच्या पश्यात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.