
देवगड : प्रहार दिव्यांग संघटनेच्या देवगड तालुका अध्यक्षा श्रद्धा बापू आंबेरकर यांच्या मातोश्री देवगड तालुक्यातील जामसंडे - कावलेवाडी येथील प्रतिष्ठित रहिवाशी मनोरमा केशव भुजबळ यांचे मुंबई येथे राहत्या घरी दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वा. २० मी. अल्पशा आजाराने निधन झाले. त्या " माई " या नावाने सुपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून , नात, २ विवाहित मुली, २ जावई,4 नातवंडे भाऊ, भावजय, भाचा, भाची, पुतणे असा मोठा परिवार आहे.