माडखोल देवस्थानचे मानकरी दाजी राऊळ यांचे निधन

माडखोल गावच्या देवस्थानात मार्गदर्शक म्हणून तब्बल सात दशके योगदान
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 28, 2022 16:25 PM
views 261  views

सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल पावणाई रवळनाथ देवस्थानचे जुने जाणते मानकरी दाजी राघो राऊळ (वय ९०) यांचे शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. माडखोल गावच्या देवस्थानात मार्गदर्शक म्हणून त्यांनी तब्बल सात दशके महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेत राऊळ कुटुंबीयांचे सांत्वन केले. शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, नातसून, पतवंडे जावई असा परिवार आहे. सेंट्रल बँकेच्या कुडाळ शाखेचे निवृत्त कर्मचारी राघो राऊळ, ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमधील परिचर एकनाथ राऊळ, राजन राऊळ तसेच सैनिक आंबोली येथील सैनिक स्कूलच्या सावंतवाडी कार्यालयातील निवृत्त कर्मचारी विजय राऊळ यांचे ते वडील तर सामाजिक कार्यकर्ते सुयोग राऊळ यांचे ते आजोबा होत.