
दोडामार्ग : तळकट कट्टा येथील भरत रामा सावंत (वय ६५ ) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता.१) दुपारी निधन झाले. भरत सावंत हे सार्वजनिक बांधकाम खात्यातून सेवा निवृत्त झाले होते. त्यांनी रत्नागिरी, सावंतवाडी व दोडामार्ग येथे सेवा बजावली. हसतमुख व बोलक्या स्वभावाने ते सर्व परिचित होते. गावातील विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. शिवाय अनेक नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या मुलांचे अनेक विवाह त्यांनी जुळविण्यात त्यांनी जुळविले होते. ते गावासह पंचक्रोशीत त्या भागाच्या विकासासाठी सुद्धा कार्यरत असल्याने सर्वदूर परिचित होते. तळकट येथील विठ्ठल रखुमाई सप्ताह मंडळ अध्यक्ष, गावातील रंजनकला नाट्य मंडळाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं होते. अष्टविनायक मित्रमंडळाचे सध्या ते अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. तळकट गावचे सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांचे ते चुलत आजोबा होत. त्यांच्या पच्छात पत्नी व भाऊ, पुतणे असा परिवार आहे.