हरिचरणगिरी समुद्र किनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह !

Edited by: दिपेश परब
Published on: May 09, 2024 07:45 AM
views 579  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी हरिचरणगिरी येथील समुद्र किनाऱ्यावर गुरूवारी ९ मे ला सकाळी अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाच्या अंगावर केवळ हाफ पॅन्ट आहे. दोन दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.

सकाळी समुद्रातून पाण्याबरोबर वाहत येऊन हरिचरणगिरी येथील किनाऱ्यावर लागलेल्या या मृतदेहाबाबत सागर रक्षक दल सदस्य योगेश तांडेल यांनी वेंगुर्ले पोलिसांना माहिती दिली. वेंगुर्ले पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, आपल्या परिसरामध्ये कुणी व्यक्ती बेपत्ता असल्यास त्याची माहिती वेंगुर्ले पोलीस ठाण्यात संपर्क करून द्यावी असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी केले आहे.