
कुडाळ : कोकण रेल्वे मार्गावर गोव्याच्या दिशेने कुडाळ नाबरवाडी येथे आज सकाळी ११ च्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा एक मृतदेह आढळून आला आहे. पोलीस तपासाअंती ही आत्महत्या असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, गोव्याकडे जाताना कुडाळ नाबरवाडी येथील ट्रॅकवर हा मृतदेह आढळला. याबाबत रेल्वे मोटरमनने याची खबर कुडाळ रेल्वे स्थानकात दिली.
त्यानंतर कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावली. कुडाळचे पोलिस उप निरीक्षक सागर शिंदे, ओंकार पाटील, परुळेकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.