
दोडामार्ग : शिक्षक नेते तथा शिक्षकांच्या हक्कासाठी सातत्याने मैदानात उतरून संघर्ष करणारे धडाडीचे नेतृत्व दयानंद नाईक हे सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक लढवत असून या लढवय्या नेतृत्वाला मतदारांतून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्या ज्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढा उभारण्याची आवश्यकता असते, शिक्षक मित्रांना सहकार्याची आवश्यकता असते नव्हे तर समाजातील गोरगरीब निराधार लोकांना आधाराची गरज असते, त्या त्या वेळी दयानंद नाईक हे देवदूत बनून अग्रस्थानी उभे असतात. त्यामुळे आता शिक्षकांची हक्काची बँक असलेल्या सहकार क्षेत्रात सुद्धा वेगळी पायवाट तयार करण्यासाठी सर्व स्तरातील शिक्षकवृंद यांचा दयानंद नाईक यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याने त्यांचे पारडे निवडणूक प्रचारात आघाडीवर आहे. येत्या १४ मे ला प्राथमिक शिक्षक पतपेढीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणकीत दोडामार्ग तालुक्यातून तिरंगी लढत होत असून शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष दयानंद नाईक निवडणुकीला सामोरे जात आहेत.
आमदार कपिल पाटील यांचा विश्वासू शिलेदार म्हणुन त्यांची ओळख आहे. शिवाय गेली कित्येक वर्षे ते शिक्षक संघटनात पदाधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध प्रश्नंसंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करून शिक्षकांच्या प्रश्नाना दिलेला न्याय, शिक्षक पतपेढीच्या वार्षिक सभेत अभ्यासूवृत्तीने मांडलेले बँक आणि सभासद हिताचे मुद्दे, शिक्षक बंधू भगिनींच्या सुख दुःखात आधारवड बनून आजपर्यंत दिलेली साथ, शिक्षक मित्रांच्या साथीने आपल्या शिक्षकी पेशा पलीकडे जाऊन केलेली सामाजिक कार्ये आणि शिक्षकप्रिय नेतृत्व या सर्वगुणसंपन्न बायोडेटा समोर प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मात करत बाजी आपणच मारणार असल्याचा त्यांना ठाम विश्वास आहे. इतकचं नव्हे तर तालुक्यात असलेल्या एकूण १८८ मतदारांपैकी १०४ मालक सभासद मतदार आपल्या पाठीशी उभे राहतील, असा ठाम विश्वास त्यांनी व त्यांच्या शिक्षक मतदारांनी व्यक्त केला आहे.
संघटनेचे कुशल नेतृत्व सातत्याने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व प्रशाससीय आणि सहकार या सर्वच क्षेत्राशी टच असणारा नेता म्हणून आज दयानंद नाईक यांचेकडे सहकारी शिक्षक पाहत असून, सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आतापर्यंत केलेली कामे यामुळें नाईक यांना अभ्यासू उमेदवार म्हणुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय शिक्षकांच्या हक्कासाठी, प्रशासन, राजकीय, सामाजिक व बँक सहकार या माध्यमातुन शिक्षकांच्या मदतीसाठी हमखास पोहचणारे अरुण पवार, मणिपाल राऊळ, महेश नाईक, रवींद्र देसाई, जनार्दन पाटील, सौ. प्राची गवस, सौ. पूजा बिर्जे आदींची टीम आणि तालुका शिक्षक भारतीचा प्रत्येक सदस्य मतदारांना प्राथमिक शिक्षक पतपेढी वर दयानंद नाईक यांचेसारख नेतृत्व का असायला हवं हे पटवून देत असल्याने या टीमनेही दयानंद नाईक यांच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
कै. झोरे यांचं स्वप्न साकार करणार....
संघटन कार्यातील आपला सच्चा साथीदार म्हणून कै.सखाराम झोरे यांची आवर्जून आठवण करताना तालुक्यातील अनेक शिक्षकांची न होणारी कामे झोरे आणि आपल्या विशेष प्रयत्नांनी मार्गी लावलीत, असे सर्व शिक्षक आज आम्हांलाच मत देवून कै. सखाराम झोरे यांचे स्वप्न साकार करतील, असेही दयानंद नाईक म्हणालेत.