
वैभववाडी : तिरवडे तर्फ खारेपटण येथील दयानंद बाबाजी तळेकर (55) यांनी स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता त्यांना आणले होते. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.९) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
तिरवडे तर्फ खारेपटण येथे श्री तळेकर हे राहत होते. त्यांना दारुचे व्यसन असल्याकारणाने त्यांची पत्नी त्यांच्यासोबत राहत नव्हती. त्यामुळे ते नैराश्यामध्ये होते. यातूनच त्यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी स्वतः ला पेटवून घेतले. त्यात ते पूर्णतः भाजले. या घटनेनंतर नातेवाईकांनी त्यांना उपचाराकरिता तात्काळ वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला होता.
या घटनेची खबर त्यांचा भाऊ सदानंद बाबाजी तळेकर यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास भुईबावडा दूरक्षेत्रचे पोलीस हवालदार योगेश तांडेल करीत आहेत.