दाणोलीच्यावतीने दत्तयाग - नवचंडी यज्ञ

विविध कार्यक्रम
Edited by: विनायक गांवस
Published on: April 23, 2025 20:25 PM
views 24  views

सावंतवाडी : तालुक्यातील दाणोली येथे दाणोली गाव मर्यादा व ग्रामस्थ मंडळींच्या वतीने दत्तयाग व नवचंडी यज्ञ आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे. यात गुरुवार १ मे रोजी सायंकाळी सात वाजता भजन सम्राट अमित तांबोळकर यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. 

 2 मे शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते व निवेदक प्रा. रुपेश पाटील यांच्या 'खेळ पैठणीचा - जागर नारी शक्तीचा.!' हा महिला भगिनींसाठी मनोरंजनातून प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न होणार आहे.तसेच 2 मे रोजी रात्री 8 वाजता हभप प्रभुदास आजगावकर बुवा (मालवण) यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार आहे. देवसू - दाणोली - केसरी या गावाच्या भाविक भक्तांनी व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दाणोली गाव मर्यादा व ग्रामस्थ मंडळींच्यावतीने करण्यात आले आहे.