कुडाळ - मालवण, कणकवली मतदार संघाच्या जिल्हाप्रमुखपदी दत्ता सामंत

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 27, 2024 14:11 PM
views 399  views

मालवण : शिवसेना पक्षाच्या कुडाळ-मालवण, कणकवली मतदार संघाच्या जिल्हाप्रमुख पदी देवदत्त तथा दत्ता सामंत यांची नियुक्ती मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

ही नियुक्ती एका वर्षाच्या कालावधीसाठी आहे. वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य करा असा विश्वास नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी रवींद्र फाटक, संजय आंग्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सामंत यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.