श्री वासुदेवानंद सरस्वती एकमुखी दत्त मंदिर येथे 7 रोजी साजरा होणार दत्तजयंती उत्सव

गुरुवार दि. 8 रोजी होणार समाराधना
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 06, 2022 16:42 PM
views 525  views

 सावंतवाडी : सबनीसवाडा येथील पुरातन एकमुखी दत्त मंदिर येथे मार्गशीर्ष शु. पौर्णिमा बुधवार दिनांक ०७ रोजी श्रीदत्त जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा होणार आहे. त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक ०८ रोजी समाराधना होणार असून दत्त भक्त, भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीदत्तजयंती उत्सव समिती, सबनीसवाडा यांजकडून करण्यात आले आहे.

    श्री दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने एकमुखी दत्त मंदिर येथे मंगळवार दिनांक ०६ रोजी सायंकाळी ०५.०० वाजलेपासून पासून बुधवार दिनांक ०७ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अखंड नामस्मरण करण्यात येणार आहे. बुधवार दिनांक ०७ रोजी सकाळी ९.०० ते १२.०० श्री एकमुखी दत्तमूर्ती पूजा, एकादशनी, लघुरुद्र, अभिषेक इत्यादी. सायंकाळी ५.०० ते ६.१५ श्रीदत्त जन्मावर सुश्राव्य कीर्तन  ह.भ.प. सौ.ललित प्रभाकर तेली, सावंतवाडी यांचे. ६.१५ वाजता श्री दत्त जन्म व ६.३० वा. पासून तीर्थप्रसाद दिला जाईल. रात्रौ ८.०० नंतर श्रींची पालखी प्रदक्षिणा सोहळा आयोजित केला असून तद्नंतर श्रीदत्त प्रसाद भजन मंडळ, सबनीसवाडाचे भजनादी कार्यक्रम पार पडणार आहेत.

मार्गशीर्ष कृ.प्रतिपदा गुरुवार दिनांक ०७ डिसेंबर रोजी सकाळी ८.०० ते १२.०० श्रीएकमुखी दत्त पूजा, एकादशणी, अभिषेक ई. दुपारी १२ ते १.०० महाआरती व मंत्रपुष्पांजली दुपारी १.०० वा. समाराधना व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार. तरी सर्व दत्तभक्त भाविकांनी श्री.दत्त जयंती उत्सव व श्री दत्त मंदिर सभामंडप बांधकामासाठी यथाशक्ती मदत देऊन श्रींचे आशीर्वाद घ्यावेत असे श्री एकमुखी दत्त जयंती उत्सव समितीने आवाहन केले आहे.