एकमुखी दत्तमंदिरात विविध कार्यक्रम

Edited by: विनायक गांवस
Published on: December 12, 2024 14:45 PM
views 175  views

सावंतवाडी : सावंतवाडी, सबनीसवाडा येथील एकमुखी दत्त मंदिर येथे दत्तजयंती निमित्ताने शनिवार १४ व रविवार १५ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सर्व भाविक भक्तगणांनी उपस्थित राहून श्रींचे आशीर्वाद घ्यावेत तसेच रविवारी समराधना होणार असून दुपारी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक उपसमिती, सबनीस वाडा सावंतवाडीने केले आहे. 

शनिवार दिनांक १४ रोजी सकाळी ६.०० ते रात्रौ ८.०० श्री एकमुखी दत्त पूजा, एकादशमी, लघुरुद्र, अभिषेक, नामस्मरण. सायं. ५०० वा. पासून श्रीदत्त जन्मावर ह. भ. प. सौ. ललिन तेली यांचं सुश्राव्य कीर्तन, ६.१५ वा. दत्त जन्म, ६.३० वा. तीर्थप्रसाद ७.४५ वा. श्रींचा पालखी सोहळा, ८.३० वाजलेपासून भजनादी कार्यक्रम. 

रविवारी दिनांक १५ मार्ग. कृ.प्रतिपदा सकाळी ८.०० वा.श्रीएकमुखी दत्त पूजा, एकादशमी, अभिषेक, दुपारी १२.३० वा. श्रींची आरती, मंत्रपुष्पांजली, दु. १.३० वा. पासून महाप्रसाद असे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक दत्त भक्तांनी श्रींचे आशीर्वाद आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.  श्री स्वामींच्या कृपाशीर्वादाने श्री एकमुखी दत्तमंदिरच्या सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काहीच दिवसात सुसज्ज अशा अन्नपूर्णा इमारत व भक्तनिवासाचे काम देखील सुरू होणार आहे.