
सावंतवाडी : माजगाव-मेटवाडा येथील श्री दत्त मंदिरात शनिवार १४ डिसेंबरला श्री दत्तजयंती उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त १४ व १५ डिसेंबरला विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. १४ डिसेंबरला पहाटे ५ ते दुपारी १ वाजेपर्यत लघुरुद्र, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, सार्वजनिक एकादशमी, आरती आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
सायंकाळी ५ वाजता श्रींची पालखी मिरवणूक दत्तमंदिर ते सावंतवाडी बाजारपेठ अशी शहरातून जुन्या मुंबई-गोवा महामार्गाने माजगाव अशी काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजल्यापासून भजनाचे कार्यक्रम, रात्री १० वाजता कीर्तन व रात्री १२ वाजता श्रींचा दत्तजन्म उत्सव सोहळा व आरती होणार आहे. रविवार १५ डिसेंबरला सकाळी ७ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम, सकाळी ९ ते १२ या वेळेत 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हे दत्तगुरुंचे नामस्मरण, त्यानंतर महाआरती व दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसाद होणार आहे.