
सिंधुदुर्ग : दशावतार क्षेत्रातील युवा कलाकार कृष्णा (साहिल) शंकर लाड आर्ट्स टुरिझम अँड कल्चर फेस्टिवल मध्ये नुकताच राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषद गोवा महाराष्ट्र राज्य २०२६ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृष्णा उर्फ साहिल यांची अभ्यासू कलाकार म्हणून ओळख आहे. त्यांना प्रदान झालेल्या पुरस्कारामुळे सर्व क्षेत्रातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
आर्ट्स टुरिझम अँड कल्चर फेस्टिवल समिती - गोवा आणि नागेश महारुद्र फाउंडेशन गोवा यांच्यावतीने राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषद गोवा महाराष्ट्र राज्य २०२६ कला व संस्कृती भवन पणजी गोवा येथे संपन्न झाली यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सेट क्रुझ गोवा आमदार रोडॉल्फो फर्नांडिस, रिटायर्ड गोवा प्रोफेसर उल्हास प्रभू देसाई, मराठी अभिनेते अभय खडपकर आदी मान्यवर उपस्थित होते.
१४ वर्ष रंगभूमीवर
कृष्णा शंकर लाड (साहिल) हे दशावतार क्षेत्रात गेली १४ वर्षे काम करीत आहेत. त्यांनी सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ मुंबई, खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोली, बोर्डेकर दशावतार नाट्य मंडळ दोडामार्ग, मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड, रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ हुमरस, जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस अशा कंपनीत काम केले तर सद्य स्थितीत ते जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस दांडेली सावंतवाडी येथे कार्यरत आहेत.
दशावतार क्षेत्रात अशी झाली सुरुवात सुरुवात
शालेय जीवनात शालेय स्नेह संमेलनामध्ये सुरुवात इयत्ता चौथीत त्यांनी सुरुवात केली. आई वडील जत्रा असल्या की झोपेतून उठून घेऊन जायचे त्याचा प्रभाव जास्त त्यांच्या दशावतार क्षेत्रातील वाटचालीत झाला. त्यामुळे आई वडील आपले पहिले गुरु असल्याचे श्री. लाड सांगतात.
दशावतार क्षेत्रात त्यांना, शंकर पिळणकर, गोविंद मराठे, विनोद घोणे, शंकर मेस्त्री, गणपत मांजरेकर, विलास गवस, गौरव शिर्के, दादा राणे, सिद्धार्थ मेस्त्री, ज्ञानेश्वर नाईक, नारायण आशियेकर हे गुरु लाभले तर त्यांनी दशावतार क्षेत्रात पंढरी घाटकर, चारुदास मांजरेकर, प्रथमेश मेस्त्री, रमेश शिरोडकर यांच्या भूमिका आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवल्या आहेत. आपणास जो पुरस्कार मिळाला त्याचे श्रेय दादा राणे यांना असल्याचे सांगितले. या पुरस्कारामुळे त्यांच्या हुमरस गावासह अनेक ठिकाणी सन्मान करण्यात आला.










