
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग युवा ग्रुप, पिंपरी चिंचवड, पुणे यांच्यावतीने संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे येथे 'शाप-प्रतिशाप' या दशावतारी प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कोकण विभागीय राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी दीपप्रज्वलन करून केले. या वेळी नगरसेविका सुजाता पलांडे, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहराध्यक्ष वर्षा जगताप, सुदाम परब, अजय पाताडे, सुनील पालकर, विजय परब आदी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना सौ अर्चना घारे परब म्हणाल्या "दशावतारी कला म्हणजे कोकणचा जीव. कोकणातल्या मातीत रुजलेली आणि बहरलेली लोककला म्हणचे दशावतार. सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरले आहे. ही गर्दी सांगते की, आपल्या गावापासून, आपल्या माणसांपासून, आपल्या मातीपासून शेकडो किलोमीटर दूर राहून देखील आपला कोकणी माणूस, आपला कोकण, आपली माणस, आपली संस्कृती विसरला नाही. कोकणी माणसाची नाळ आपल्या मातीशी घट्ट जोडली गेली आहे. हेच यावरून सिद्ध होते." सिद्धेश कलिंगन, दादा राणे आणि सर्वचे कलाकारांनी अप्रतिम अभिनय सादर केला. या कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग युवा ग्रुप, पिंपरी चिंचवड, पुणे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सागर गावडे, अमित वारंग, गजानन परब, महादेव बागवे, प्रशांत अनिल माळकर, सुधन गवस, प्रवीण राऊळ, कृष्णा गवस, सदाशिव मोराजकर, उमेश पंडित, संदीप धुरी, सुनील वझे आणि सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.