दशावतार कलेला राजाश्रयासाठी BJP ची मोलाची कामगिरी : विशाल परब

Edited by: विनायक गांवस
Published on: August 25, 2024 15:21 PM
views 99  views

सावंतवाडी : दशावतार ही कला म्हणजे कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्राचा कणा मानला जातो. "रात्रीचा राजा आणि सकाळी कपाळावर बोजा" अशी एक म्हण पूर्वी कोकणात रूढ होती. याचे कारण म्हणजे या लोककलेला राजाश्रय नव्हता. मात्र, अलीकडे भारतीय जनता पार्टीने दशावतार कलेला राजाश्रय मिळावा यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांनी या कार्यात भरीव सहयोग दिलेला आहे असं प्रतिपादन भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले.

दशावतार कलाकारांच्या मुलांचा गुणगौरव सोहळा दशावतारी कलाकार बहुउद्देशीय संघ सावंतवाडी यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे श्रीदेवी माऊली मंदिर इन्सुली येथे आयोजित करण्यात आला होता. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. दहावी बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या अनेक मुलांचा गुणगौरव सोहळा यावेळी करण्यात आला. सायंकाळी सावंतवाडी तालुक्यातील निवडक कलाकारांच्या संचात दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. दशावतारी कलेचा अभिमान आणि वारसा पुढील पिढीनेही धारण करायला हवा, यासाठी या मुलांच्या समोर दशावतारी कलाकार आपल्या निवडक कलाकारांच्या संचात हा नाट्यप्रयोग साजरा केला होता. विशाल परब यांनी या आगळ्या कल्पनेचे कौतुक करत दशावतार कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत अभिनंदन केले. 

यावेळी ऍड अनिल नरवडेकर, माऊली देवस्थान कमिटी इन्सुली माजी अध्यक्ष कृष्णा सावंत, जेष्ठ दशावतार कलावंत श्याम निवेलकर, तंटामुक्ती अध्यक्ष इन्सुली सदानंद कोलगावकर, माऊली देवस्थान कमिटी विद्यमान अध्यक्ष मनोहर गावकर, नारायण राणे, महेश धुरी मानकरी श्री.परब,श्री.गावडे श्री.धुरी श्री.गावकर, इन्सुली वि.वि.कार्यकारी सोसायटी आनंद राणे आदी उपस्थित होते.