दशावतार कलावंत कै. राजन गावडेंच्या कुटुंबियांना संदिप गावडेंचा मदतीचा हात

Edited by: विनायक गावस
Published on: August 02, 2023 16:06 PM
views 234  views

वेंगुर्ले : सुप्रसिद्ध दशावतार कलावंत राजन गावडे यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या अकाली निधनानं गावडे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला होता. माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी आज दशावतार कलावंताच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांना धीर दिला. यावेळी मातोंड येथील गावडे कुटुंबाला आर्थिक मदत केली. याप्रसंगी कोनशी गावचे माजी सरपंच कृष्णा गवस, दशावतार कलावंत दादा राणे कोणसकर, उदय राणे कोणसकर, सौरभ गावडे आदी उपस्थित होते.