
दोडामार्ग : दशावतार कला ही कोकणाचा श्वास आणि अभिमान आहे. येथील कलाकारांनी या कलेचा वसा आणि वारसा जपलेला आहे. खरतर ही कला वाखाणण्याजोगे आहेच पण हा अभिमानास्पद वारसा सुद्धा जपण गरजेचं आहे. म्हणूनच पुढील काळात निश्चितच दशावतारी कलाकारांना राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराकडून सहकार्य असेल, असा विश्वास कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा अर्चना घारे यांनी व्यक्त केला.
रविवारी घारे यांनी दोडामार्ग तालुक्यातील दशावतारी कलाकारांची भेट घेत चर्चा केली. यावेळी त्या म्हणाल्या की, मी लहान पणा पासून दशावतार नाटक बघते तेंव्हापासून अतिशय कौतुक वाटते, किती ते कष्ट करतात, रात्रीचा राजा असला तरी दिवसाच ते वास्तव असत त्यांना अतिशय कठीण परिस्थितीचा सामाना करावा लागतो. अतिशय कमी मानधन, मात्र येथील कलाकार बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतो, कष्टातून ही वर जाऊन अतिशय प्रामाणिकपणे दशावतारी कला सांभाळीत आहेत. कोकणातील रसिक प्रेक्षक त्यांना दाद देत असतो त्याच्यामुळे ते आज एवढे पुढे गेले आणि त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. या दशावतारी कलाकारासाठी काहीतरी केले पाहिजे, शासनाच्या ज्या काही योजना असतील त्यांना पन्नास वर्षे झाली तरी त्यांना लाभ मिळत नाही. स्थानिक अडचणी आहेत. पुढच्या काळात नक्कीच काहीतरी करता येईल का? यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन कलाकारांसाठी काही योजना असतील त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. पुढच्या काळात नक्कीच आपण त्यांच्या सोबत असू सहकार्य करू, दशावतार कलेला कस जोपासता येईल यासाठी नक्कीच आमची सर्वजणाची जबाबदारी आहे अस मला वाटत. अनेक तरुण दशावतार कलेकडे वळले आहेत. अनेक भजनी मंडळ आहेत. म्हणजे कलेचा वारासा कोकणाच्या मुलांनी वाढवीलेला आहे. निश्चितच येत्या काळात त्यांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराकडून सहकार्य राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप चांदेलकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, दोडामार्ग शहर अध्यक्ष सुदेश तुळसकर, दशावतार कलाकार समितीचे अध्यक्ष सुभाष लोंढे, उपाध्यक्ष विलास गवस, सचिव शंकर जाधव, सल्लागार कृष्णा नाईक, अंकुश जाधव, खजिनदार राजेंद्र बांदेकर, सदस्य कृष्णा कुंभार, अभिमन्यू बांदेकर, प्रकाश वर्णेकर, प्रभाकर गवस, विठ्ठल गावकर, नारायण खांबल, रत्नाकर गवस उपस्थित होते.