
वेंगुर्ला: तालुक्यातील आसोली वडखोल गावचे सुपुत्र दशावतार युवा हार्मोनियम वादक संकेत कुडव याना वात्सल्य सामाजिक संस्था व निर्धार न्यूज लोकसेवा फाऊंडेशन (महाराष्ट्र) यांच्या वतीने महाराष्ट्र दशावतार कला शिव सन्मान पुरस्कार २०२३ देऊन गौरविण्यात आले.
कुडाळ येथे आयोजित छत्रपती शिवराय संमेलन २०२३ या कार्यक्रमात संकेत कुडव यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे व सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संकेत कुडव हे दशावतार हार्मोनियम वादक सोबत उत्कृष्ट भजन गायक आहेत. अगदी लहान वयात कुडव यांनी स्वतःला संगीत कलेत झोकून दिलं आणि नावलौकिक प्राप्त केल. कुडव हे सध्या दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग या मंडळात हार्मोनियम वादक म्हणून कार्यरत आहेत. या सन्मानाबाबत सर्व स्तरावातून त्यांचे अभिनंदन होत आहे.