
दापोली : बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा, इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी. तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशी सरकारला भारत सरकार तर्फे निर्देश देण्यात यावे. या विषयाचे निवेदन भारत देशाच्या राष्ट्रपतींपर्यंत पोहचवण्यासाठी आज दापोली येथे सकल हिंदू समाजातर्फे दापोली तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी ही हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली होती.
बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर देखील तो अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी आदिवासी व दलीत हिंदू बांधवांना ईस्लामी कट्टरतावाद्यांनी अवैध मार्गाने जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करून टाकले आहे.
बांगलादेशचे सरकार देखील हिंदूं सोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचास मूकसंमतीच देताना दिसून येत आहे. या सर्व अत्याचाराची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे. या यात्रेवेळी अत्यंत कठोर शब्दात याचा निषेध व्यक्त करण्यात आला. या सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंना देखील बांगलादेशच्या सरकारने देशद्रोह्याची कठीण कलमे लावून तुरुंगात डांबले आहे.
स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेश मधील हिंदूंची संख्या ३८ % होती ती घटून आज केवळ ८% राहिली आहे. आपल्या सरकारने जर वेळीच पावले उचलली नाही तर बांगलादेशातील ८% हिंदू व अन्य अल्पसंख्यांक समाज जिहादी इस्लामी कट्टरता वादाला बळी पडून संपूर्णपणे नामशेष होईल, असे भविष्य स्पष्टपणे दिसून येत आहे.
आम्ही सकल हिंदू समाज भारत सरकारास आवाहन करतो की, बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ अमलात आणावेत आणि अटकेत असलेल्या बांग्लादेशातील साधूची त्वरित मुक्तता व्हावी यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे. त्याप्रमाणे दापोली शहर आणि दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांनी मिळून हे निवेदन दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांच्याकडे सुपूर्द केले. यात्रा ही केळसकर नाक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बजारपेठतून पुढे पोष्टाच्या गल्लीतून थेट तहसील कार्यालयात कार्यालयात नेण्यात आली. यावेळी पुरुषांबरोबर महिला देखील जास्त प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.