डाॅन्टस यांचा प्रथम स्मृती दिन पुण्यास्मृतिदिन सप्ताह म्हणून साजरा

Edited by: विनायक गांवस
Published on: October 07, 2024 12:07 PM
views 224  views

सावंतवाडी : सहकार रत्न कै. पी.एफ. डाॅन्टस यांचा प्रथम स्मृती दिन दि. 8 ऑक्टोबर पासून पुण्यास्मृतिदिन  सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त दि. 8 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता सैनिक पतसंस्था, शाखा- कोलगाव येथील सभागृहात कै.पी.एफ. डाॅन्टस यांची पुण्यतिथी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून पी.एफ. डाॅन्टस फाऊंडेशनचे अनावरण यावेळी करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी असून प्रमुख पाहुणे इंडियन एक्स सर्विसेस लीग सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. शशिकांत गावडे, कर्नल (निवृत्त) विजयकुमार सावंत, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन श्री.बाबुराव कविटकर, कॅथॉलिक  अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन  श्रीम. अनमारी डिसोजा, फादर मिलेट डिसोजा उपस्थित राहणार आहेत.

दि. 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05.00 वाजता  मिलाग्रिस हायस्कूल, सावंतवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या बॅगचे वाटप, दि. 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 05.00 वाजता संविताश्रम पणदूर, कुडाळ येथे धान्यवाटप कार्यक्रम, दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी 04.00 वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी येथे शालेय रंगभरण स्पर्धा, दि. 14 ऑक्टोबर सकाळी 08.00 वाजता नवसरणी, सावंतवाडी येथे रक्तदान शिबीर, दि. 16 ऑक्टो. रोजी सकाळी 09.00 वाजता सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली येथे 14 वर्षे खालील व 17 वर्षे खालील खेळाडूंची तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

16 ऑक्टोबर सायंकाळी 04.00 वाजता पुण्यास्मृतिदिन सप्ताहाचा समारोप करण्यात येईल. यावेळी बक्षिस वितरण सोहळा होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष . जॉय डॉन्टस यांनी केले आहे.