
सावंतवाडी : दाणोली येथील समर्थ सद्गुरू साटम महाराज समाधी मंदिरात गुरुवार, १२ डिसेंबर रोजी अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सात प्रहराच्या या सप्ताहाची सांगता १३ डिसेंबरला दुपारी महाप्रसाद कार्यक्रमाने होणार आहे.
'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या अखंड दत्तनाम सप्ताहाला गुरुवारी सकाळी ११ वाजता विधिवत प्रारंभ होणार आहे. सांगता शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. नंतर सवाद्य पालखी सोहळा, दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.