केलेल्या कामाची पोचपावती ; दांडेली ग्रा. पं. च्यावतीने तलाठी सतीश गावडे यांचा खास सन्मान

नव्याने रुजू झालेल्या तलाठी नाडकर्णी यांचंही स्वागत
Edited by: जुईली पांगम
Published on: July 13, 2023 19:17 PM
views 208  views

सावंतवाडी : दांडेली ग्रामपंचायतच्यावतीने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने तलाठी सतीश गावडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. नुकतीच त्यांची बदली झाली. यानिमित्ताने गावासाठी दिलेल्या योगदानाबद्दल - प्रामाणिक सेवेसाठी त्यांना सन्मानित करण्यात आलं. 


सरपंच निलेश आरोलकर यांच्या हस्ते शाल - पुष्पगुच्छ देत सतीश गावडे यांना सन्मानित करण्यात आलं. तसेच त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेल्या बांद्यातील तलाठी नाडकर्णी मॅडम यांचंही स्वागत करण्यात आलं.


तसेच भाजपचे युवा मोर्चाचे अमोल आरोसकर यांच्यावतीने दोघांना सन्मानित करण्यात आलं. 


 दांडेली ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्यावतीने या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा पालयेकर, सदस्य प्रफुल्लता मालवणकर, पोलीस पाटील अनंत मालवणकर, माजी सरपंच योगेश नाईक, रसिक दळवी, सिद्धेश मालवणकर, संदीप माणगावकर, बाळा शिरोडकर, गजानन परब, विजय नाईक, गोविंद दाभोलकर, मयुरी नाईक, सृष्टी गोडकर,आपा कामत, बाळू माणगावकर आदी उपस्थित होते.