आॅल इंडिया ग्रामिण डाक सेवक संघटनेचे धरणे

Edited by: भरत केसरकर
Published on: August 09, 2023 20:08 PM
views 140  views

कुडाळ : आॅल इंडिया ग्रामिण डाक सेवक संघटना सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन उद्या दुपारी तीन ते पाच या वेळेत ओरोस येथील डाक अधिक्षक यांच्या विभागीय कार्यालयासमोर होत आहे.पाच लाखाची ग्रॅच्युइटी मिळणे,पाच लाख ग्रुपवीमा मिळणे,नियमित कर्मचार्‍याप्रमाणे आठ तासाचे वेतन मिळणे आणी आठ तासांची कार्यप्रणाली करणे,180 दिवसांची  भरपगारी रजा रोखीने मिळणे,12:24:36 ची बढती मिळणे या विविध मागण्यांसाठी हे एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे.तरी या आंदोलनात जास्तीत जास्त कर्मचारी वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन या संघटनेचे अध्यक्ष संतोष विष्णू हरियाण आणी सचिव तुकाराम बाळकृष्ण गावडे यांनी केले आहे.