सुपारी केळी बागायातींचे नुकसान

सुपारी - केळी बागायतींचे नुकसान
Edited by:
Published on: June 27, 2024 14:28 PM
views 205  views

दोडामार्ग : नारळ सुपारी बागायतींचे नंदनवन म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील तळकट पंचक्रोशी पुन्हा एकदा सावट गडद झाले आहे बऱ्याच कालावधीनंतर तिलारी खोऱ्यात स्थिरावलेले वन्य हत्ती तळकोट येथे दाखल झाले असून तेथील सुपारी केळी नारळ बागायतीचा नुकसान केल आहे. त्यामुळे शेतकरी ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळकट कोलझर बाधा या परिसरात हत्ती दखल झाले असून तेथील बागायतदार चंद्रकांत नांगरे व भरत देसाई यांचे केळी आणि सुपारी बागायातीचे नुकसान केल आहे. बऱ्याच केळी फस्त करून हत्तींनी सुपारी झाडे ही मोडून टाकली आहेत.  

चंद्रकांत नांगरे हे शेतकरी गुरुवारी आपल्या बागायतीमध्ये गेले असता त्यांना हत्तींनी केळी मोडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ही माहिती तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांना दिली. त्यांनी लगेच वनविभगाशी  संपर्क साधत ही माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे वनपाल किशोर जंगले वनकर्मचारी गवस, सावंत यांनी नुकसानीची करून वन्य हत्तींच्या हालचालींचा मागोवा घेतला. त्यानंतर तळकट गावातील युवकांनी सुद्धा त्या भागात जाऊन पाहणी केली.  हत्तींनी सुपारी आणि केळीची नासधूस  केल्याने तेथील शेतकरी ग्रामस्थ धास्तावले असून वन्य हत्तींच्या आगमनाने पुन्हा एकदा सुपारी, नारळ व केळी बागायातींच नंदनवन धोक्यात असल्याचं बोललं जात आहे.