मुसळधार पावसाने मालवणात नुकसान ; निलेश राणे धावले मदतीला

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 21, 2023 21:36 PM
views 129  views

मालवण  : मालवण तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीमुळे नुकसान झाले. कुडाळ मालवण  भाजप विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे तत्परतेने मालवणात दाखल झाले. सुकळवाड, नांगरभाट, मालवण शहर येथे नुकसानग्रस्त ठिकाणी भेट देत नागरिकांना मदतीचा हात दिला.


दरम्यान, शासन स्तरावरून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे निलेश राणे सांगत नागरिकांना आश्वस्त केले. काळजी करू नका मी सोबत आहे हा विश्वास निलेश राणे यांनी संकटग्रस्त नागरिकांना दिला.


यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी सभापती माधुरी बांदेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आंनद शिरवलकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, मोहन वराडकर, विजय निकम, विरेश पवार, राजू बिडये, महेश सारंग, मंदार लुडबे, ललित चव्हाण, निनाद बादेकर, निकित वराडकर, निषय पालेकर, सरपंच युवराज गरुड, स्वप्नील गावडे, चेतन मुसळे, बाबू कदम यासह अन्य नागरिक उपस्थित होते.


मालवण शहर मुस्लिम महोल्ला येथील नगमा शेख कुटुंबीय यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले. त्या कुटुंबाची चौकशी करत शासन पंचनामा व अन्य माहिती जाणून घेतली. तर रेवतळे येथील संगीता संजय मंडलिक या मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबीय यांच्या घरात बाजूच्या कॉम्प्लेक्स भराव मुळे पाणी घुसले. त्या कुटुंबाची भेट घेऊन आर्थिक मदतीचा हात दिला. तसेच अन्य स्वरूपातही मदत मिळवून देण्याचे सांगितले.