दै. कोकणसाद, कोकणसाद LIVE च्या आरती संग्रहाचं शानदार प्रकाशन..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 16, 2023 19:24 PM
views 206  views

सावंतवाडी : कोकणचं पहिलं  दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. १ महाचॅनल कोकणसाद LIVE च्या आरती संग्रहाच प्रकाशन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, श्रीराम बोअरवेल्सचे अजित पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक, कोकणसादचे संपादक संदीप देसाई, मार्केटिंग व्यवस्थापक समीर सावंत आदींची प्रमुख उपस्थितीत होती. कोकणसादच्या सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयात हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी कोकणवासीयांचा सण कोकणसाद जगभर पोहचवत आहे. दर्जेदार अशा आरती संग्रहानं या उत्सवास प्रारंभ झाला आहे असं मत मनिष दळवी यांनी व्यक्त केलं. आरती संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचं संपादक संदीप देसाई यांनी स्वागत केले. सुरुवातीला कोकणसादचे संपादक संदीप देसाई यांनी प्रास्ताविक केल. तर कोकणसाद LIVE च्या गणेश सजावट स्पर्धेची घोषणा केली.

यानंतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दर्जेदार अशा कोकणसादच्या आरती संग्रहाच शानदार प्रकाशन करण्यात आलं. मनोगता व्यक्त करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले, देशात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. कोकणात हा उत्साह मोठ्या धुमधडाक्यात केला जातो. कोकणसाद नेहमीच सिंधुदुर्गतील भक्तीमार्गासह येथील परंपरा, संस्कृती टिकवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतं. कोकणवासीयांचा हा सण जगभर पोहचवला जातो. कोकणसादच्या दर्जेदार अशा आरती संग्रहान या उत्सवास प्रारंभ झाला आहे असं मत व्यक्त करत जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत असताना गणेशोत्सवाच्या कोकणवासीयांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक म्हणाले, दरवर्षी दर्जेदार आरती संग्रह कोकणसाद घेऊन येत. देवदेवतांच्या आरतीचा हा संग्रह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा असं मत त्यांनी व्यक्त केलं. तर हा आरती संग्रह भाविकांच्या उपयोगाचा ठरेल. गणेशोत्सवात  पोलिस म्हणून चोख बंदोबस्त ठेवून निर्विघ्नपणे उत्सव पार पडण्यासाठी पोलिस विभाग मेहनत घेईल असं  पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी म्हणाले. दरम्यान, लोकांच्या समस्या कोकणसाद मांडत असत.  आमच्याही चांगल्या कामाच कौतुक ते करतात. यंदाचा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, कोकणची परंपरा कायम जपावी असं आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केल. तर डिजे संस्कृती आपल्याकडे नाही ही चांगली गोष्ट आहे असं मत तहसीलदार पाटील यांनी व्यक्त करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. 

प्रकाशन सोहळ्याचे आभार सावंतवाडी प्रतिनिधी विनायक गांवस यांनी मानले. यावेळी उपसंपादक रविंद्र जाधव, लक्ष्मण आडाव, वेंगुर्ला प्रतिनिधी दिपेश परब, सब एडिटर जुईली पांगम, जिल्हा वितरण प्रतिनिधी अशपाक शेख,अविनाश बांदेकर, सुशांत परब, प्रसाद कदम, मयुरेश राऊळ,अनिकेत नार्वेकर, साहिल बागवे, संतोष गुडुळेकर आदी उपस्थित होते.