NEMS स्मार्ट किड्स तळेरेमध्ये दहीकाला उत्साहात

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 06, 2023 16:31 PM
views 156  views

कणकवली : NEMS  स्मार्ट किड्स तळेरे येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून दहीकाला उत्सव आनंदाने साजरा करण्यात आला. NEMS  स्मार्ट किड्सचे बाळगोपाळ राधा व कृष्णा यांच्या वेशात शाळेत आले होते. त्यांच्यासाठी मडके रंगवण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाचा महिमा सांगणाऱ्या  गाण्यावर नृत्य सादर करुन दहीहंडी फोडली.विद्यार्थ्यांचा उत्साह दांडगा होता. विद्यार्थी या कार्यक्रमात हरवून गेले होते. या कार्यक्रमाचे आयोजन केजी विभाग शिक्षिका गौरी पवार आणि चैताली राणे यांनी केले होते.