
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्यावतीने भव्य दहीहंडी उत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. संदीप एकनाथ गावडे यांच्या संकल्पनेतून या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सैराट फेम अभिनेत्री आर्ची अर्थात रिंकू राजगुरू या दहिहंडी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. गावडे यांनी केले आहे.
हा उत्सव सावंतवाडी राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या पटांगणात होणार असून यामध्ये सिने कलाकार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची उपस्थिती लक्षवेधी असणार आहे. आकर्षक पारितोषिके आणि सेलिब्रिटींची उपस्थिती
या दहीहंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. यावर्षीच्या दहीहंडी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक म्हणून तब्बल १ लाख ११ हजार १११ रुपये ठेवण्यात आले आहे. याशिवाय, उत्तेजनार्थ पारितोषिके म्हणून प्रत्येक संघाला ११,१११ रुपये दिले जाणार आहेत. या कार्यक्रमाला सैराट चित्रपट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू उर्फ आर्ची हीची विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. संदीप एकनाथ गावडे आणि समस्त भाजप परिवार यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ढोलपथक, ऑर्केस्ट्रा, आणि डीजेच्या तालावर सांस्कृतिक दहीहंडीचा थरार अनुभवता येणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उत्सवात अधिक रंगत येणार आहे.