वैभववाडीत ठाकरे सेनेची दहीहंडी रद्द

मालवणातील घटनेमुळे निर्णय : अतुल रावराणे
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 27, 2024 07:32 AM
views 289  views

वैभववाडी : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर वैभववाडीत आजचे दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. शिवसेना कार्यालयात श्रीकृष्णाच पुजन करण्यात येणार आहे. उर्वरीत सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येणार आहेत अशी माहिती शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी दिली.