
दोडामार्ग : दोडामार्ग शहर बाजारपेठ युवा वर्गाचा भव्य दहीहंडी उत्सव युवा वर्गाने मोठ्या उत्साहात साजरा केला. दोडामार्ग पिंपाळेश्वर चोकात आयोजन करण्यात आलेला हा युवा वर्गाचा जल्लोष पाहण्यासाठी शहरातील नागरिकानी मोठी गर्दी केली होती. येथील पिंपळेश्वर चौकात मंगळवारी रात्री उशिरा पर्यन्त शहरातील गोविंदानी या उत्साहाचा आनंद लुटत दहीहंडी फोडली.
तब्बल तीन ते चार तास गोविंदचा उत्साह आणि उपस्थित नागरिकांचा प्रतिसाद यामुळे शहर मुख्य बाजारपेठ पिंपळेश्वर चौकात मंगळवारी संध्याकाळी युवा वर्गाचा अनोखा उत्साह पाहता आला. खास दही हांडी उत्सव पाहता यावा यासाठी क्रेन बोलावून त्यावर दही हंडी बांधण्यात आली होती. डिजे आणि आकर्षक विद्युत रोशनाई , टायसाठी जनरेटर आणि अन्य सारी व्यवस्था नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते मनोज परसेकर, बांधकाम सभापती नितिन मणेरीकर, युवा उद्योजक विशाल मणेरीकर, राजेश फुलारी, समीर रेडकर, राज बोंद्रे , रंगनाथ गवस, स्वप्नील गवस, विशाल चव्हाण प्रकाश सावंत, देवेन्द्र शेटकर, तनुज ताटे, अमर सडेकर आदींनी केली होती. युवा उद्योजक विशाल परब यांनीही या युवा वर्गाला सहकार्य करत खास या उत्सवाला सुद्धा उपस्थिती दर्शविल्याने युवा वर्गाने त्यांचे आभार मानले. शहरातील नागरिक, महिला व युवा तसेच बच्चे कंपनी सुद्धा हा गोविंदा उत्सव आणि थरार पाहण्यासाठी उशिरा पर्यंत उपस्थित होते.
शहरात 3 ठिकाणी दहीहंडी उत्सव
दोडामार्ग शहरात 3 ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यात गोवा रोडवर राजेश प्रसादी यांच्या निवास्थांनासमोर तर सावंतवाडी रोडवर हिमालया कोल्डड्रिंक्स समोर व मुखी चौक येथे दहीहंडी उत्सव साजरा झाला. पोलिसांनी विशेष मेहनत घेत हा उत्सव शांततेत होण्यासाठी मेहनत घेतली.