सुप्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांचा सन्मान !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 17, 2024 08:54 AM
views 50  views

सावंतवाडी : सुप्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांचा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे सैनिक पतसंस्थेच्या 'सांस्कृतिक कला महोत्सवात' सत्कार करण्यात आला. गेली ५० वर्ष दादांनी साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला. सैनिक नागरी सहकारी पतसंस्था व श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कला महोत्सव सावंतवाडीत सुरू आहे.

या कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांचा कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. गेली ५० वर्ष ते साहित्य क्षेत्रात योगदान देत आहेत.‌ मालवणी भाषेला जपण्याचं काम त्यांनी केलं आहे‌. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.‌

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी. ए. बुवा, कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे,  सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड. अरुण पणदूरकर, भरत गावडे, प्रा. रुपेश पाटील, विनायक गांवस, सुधीर धुमे, वैभव केंकरे तसेच सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, तातोबा गवस, पी. टी. परब, कॅप्टन दीनानाथ सावंत, कॅप्टन सुभाष सावंत, श्यामसुंदर सावंत, चंद्रशेखर जोशी, सावंतवाडी पतपेढीचे चेअरमन रमेश बोंद्रे, व्हा. चेअरमन संजू शिरोडकर, दीपक राऊळ आदी उपस्थित होते. दादा मडकईकर यांचा परिचय राजू तावडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय कात्रे यांनी केले.