संगीत महोत्सवात मालवणी कवी दादा मडकईकर यांचा होणार सत्कार !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 15, 2024 14:36 PM
views 54  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व सैनिक नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त सहकार्याने उद्या 16 फेब्रुवारी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता शिवउद्यान जवळ सुप्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांचा सत्कार होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या मालवणी कवीता एक लक्षवेधी ठरत आहेत. मालवणी भाषेला जिवंत ठेवण्याचे काम ते या कवितेच्या माध्यमातून करत आहेत. त्यामुळे त्यांचा गौरव सोहळा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 16 फेब्रुवारीला सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचा होणाऱ्या संगीत महोत्सवात दादा मडकईकर यांचा सत्कार होणार आहे.

यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोमसापचे तालुकाध्यक्ष अँड. संतोष सावंत व सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, कोमसाप सहसचिव राजू तावडे यांनी केले आहे.