दाभोळे तलाठी उत्तम कदम 'लाचलुचपत' च्या सापळ्यात !

पाच पैकी तीन हजार रुपये घेताना पकडले रंगेहात
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 11, 2022 20:56 PM
views 579  views

देवगड : तालुक्यातील दाभोळे गावातील तलाठी उत्तम गंगाराम कदम यांना कुळ नोंद करण्यासाठी लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले आहे. कदम यांनी  पाच हजार रुपये लाच मागितली होती. पैकी तीन हजार रुपये घेताना त्यांना रंगेहात पकडले आहे. 

थोडक्यात हकीकत अशी की यातील आरोपी लोकसेवक उत्तम गंगाराम कदम, तलाठी, सजा दाभोळे जि.देवगड यांनी तक्रारदार यांच्या वडिलांचे शेतजमिनीच्या ७/१२ अभिलेखावर कुळ म्हणून नाव नोंद करण्याचा तहसीलदार देवगड यांनी दिलेल्या आदेशानुसार नाव नोंद करण्यासाठी रू.5000/- लाचेची मागणी केल्याचे पडताळणी अंती निष्पन्न झाले. सापळा कारवाई दरम्यान रू.३०००/- स्वीकारताना तलाठी कदम यांना रंगेहात पकडण्यात आले. पुढील कारवाई सुरू आहे.  या पथकामध्ये पो.उप.अधीक्षक  दिपक कांबळे,पो. नि.शिवाजी पाटील,पो.हवा.जनार्दन  रेवनकर,पो.ना.रवी पालकर,पो. शि.प्रथमेश पोतनीस यांचा समावेश होता.