दाभोळे ग्रा. पं. ची स्वच्छ सर्वेक्षण नामांकनासाठी राज्य व केंद्र स्तरावर तपासणी...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 13, 2023 12:14 PM
views 127  views

देवगड : दाभोळे ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय समितीने नुकतीच भेट देऊन दाभोळे ग्रा.पं.ची स्वच्छ सर्वेक्षण नामांकनासाठी राज्य व केंद्र स्तरावर तपासणी केली.यावेळी समितीमध्ये कोल्हापूर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन विजय पाटील, माहिती शिक्षण संवाद तज्ञ कोल्हापूरचे अभिषेक पाटील,कोल्हापूर स्वच्छता तज्ञ संतोष घाडगे यासह जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे संतोष पाटील, प्रविण कानकेकर, संदीप पवार, विस्तार अधिकारी निलेश जगताप, हडपिडकर बी आर सी वैशाल मेस्त्री आदी उपस्थित होते. समितीचे ग्रामपंचायतच्यावतीने स्वागत करण्यात आले.

या निवडी करिता ऑनलाईन प्रणाली व स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत ‘सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व हागणदारी मुक्त अधिक’ या विषयावर ऑनलाईन ५०० मार्कची प्रश्नावली ऑनलाईन प्रणालीवर तयार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने समितीने पाहणी केली.देवगड स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत तालुक्यातील दाभोळे ग्रामपंचायतने आतापर्यंत विविध अभियानात सहभागी होऊन बक्षीस मिळालेली आहेत. त्यामुळे आता या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्येही चांगले काम करून मानांकन मिळवण्यासाठी दाभोळ गाव सज्ज झाला आहे.

त्या दृष्टीने काम करीत आहेत.यावेळी दाभोळ सरपंच श्रीकृष्ण अनभवणे,ग्रामसेवक पांडुरंग शेटगे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली माणगावकर, संदेश चव्हाण, प्रज्ञा घाडी, धोंडू घाडी, ग्रामपंचायत कर्मचारी सागर कुळकर, जनार्दन लोरेकर, राजेंद्र घाडी, रवीना घाडी,व दाभोळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.