
सावंतवाडी : डी. वाय. फाउंडेशनच्या माध्यमातून व डी. वाय. फॉउंडेशन अध्यक्ष योगेश पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र युवक काँग्रेस विरेन दयानंद चोरघे व संस्थापक अध्यक्ष डी. डाय फाउंडेशन दयानंद मोतीराम चोरघे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत बांदा विठ्ठल मंदिर मंडळाचा पहिला नंबर सूर्यकांत गावडे वेत्ये प्रथम, ज्ञानेश्वर येडवे हनुमान सेवक मित्रमंडळ बांदा द्वितीय व सावंतवाडी संतोष गांवस प्रथम तर विर्नोडकर कुटुंबीय यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ही बक्षिस प्रदान करण्यात आली. डीवाय फाउंडेशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष व कोकण प्रदेशाध्यक्ष यश घरत व रुपेश जाधव मयूर पाटील, सदस्य संतोष तळवणेकर, शिवा गावडे, रामचंद्र कुडाळकर, अमित तळवणेकर, मंगेश माणगावकर, ज्ञानेश्वर पारधी यांच्या उपस्थितीत ही बक्षिस प्रदान करण्यात आली.