चिपळूण : रविवार १९ जानेवारी "संविधान सन्मान" स्पर्धेची अंतिम फेरी डी. बी. जे. महाविद्यालयात यशस्वीरीत्या पार पडली. संविधान सन्मान समिती, जिल्हा रत्नागिरी आणि डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित "संविधान सन्मान स्पर्धेची" अंतिम फेरी डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत उप प्राचार्य डॉ. मोरे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. वारंग आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. कदम उपस्थित होते. या स्पर्धेसाठी प्रा. अनिरुद्ध भागवत, राजेश मोहिते, शाहिद खेरटकर, टी. डि. कदम, ऍडव्होकेट स्मिता कदम आणि प्रा. जयसिंग चवरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रथमेश तांबे यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने पार पाडले. कार्यक्रमाला डॉ. गुलाबराव राजे आणि प्राचार्य डॉ. बापट यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभिजित पवार, सुनील मोहिते, श्री. भुस्कुटे, प्रेरणा तांबे, मोहिनी पवार यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. स्पर्धेत एकूण 28 स्पर्धकांनी सहभाग घेतला, ज्यांनी संविधानाच्या विविध पैलूंवर चर्चा व सादरीकरण केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व आणि त्यातील मुल्ये समजावून देण्यासाठी एक आदर्श मंच ठरला. स्पर्धेचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.