
कणकवली : कणकवलीत गॅस एजन्सीच्या बाहेर सध्या घरगुती गॅस घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. कारण बुकिंगचा सर्व्हर डाऊन आहे. तसेच काही ग्राहकांची के वाय सी (kyc )केली गेली नाही. त्यामुळे बुकिंग आणि के वाय सी करण्यासाठी वेळ लागत असल्याने गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.
सध्या इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाचा परिणाम सर्वसामान्यांना सोसावे लागत आहेत. कारण घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयाने महागला तर व्यावसायिक सिलेंडर 115 रुपयांनी महागले. त्यातच आता ऑनलाइन सर्व्हर डाऊन असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही ग्राहकांनी ऑफलाइन करावे असे देखील सांगितले. पण सध्या ही सिस्टीम ऑनलाइन असल्याने घरगुती गॅस बुकिंगला बुकिंगला वेळ लागत आहे.










