ग्राहकांना हक्कांची जाणीव असणे गरजेचे !

न्याय मिळेपर्यत पाठपुरावा करा :आरती देसाई
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 29, 2023 13:13 PM
views 61  views

वैभववाडी : ग्राहकांनी आपली फसवणुक होऊ नये म्हणुन दक्षता घेणे गरजेचे आहे. त्याकरीता ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव असणे आवश्यक आहे. परंतु जरी फसवणुक झाली तर मात्र योग्य ठिकाणी तक्रार करावी. न्याय मिळेपर्यत पाठपुरावा करावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी केले. येथील डॉ बाबासाहेब आबेंडकर भवन येथे जिल्हास्तरीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला तहसिलदार दिप्ती देसाई,नायब तहसिलदार भावना शिंदे,ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील,तालुकाध्यक्ष तेजस साळुंखे,नासीर काझी,भालचंद्र साठे,जयेंद्र रावराणे,महेश संसारे,संजय सावंत आदी उपस्थित होते. श्रीमती देसाई म्हणाल्या, ग्राहक सरक्षंण कायद्याची जाणीव व्हावी या करीता ग्राहक दिन साजरा होतोय.ग्राहकांना आपली कर्तव्य व जबाबदाऱ्या माहीती होणे हे या दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.ग्राहकांना कायद्याची जागरूकता असणे गरजेचे आहे.आपली फसवणुक झाल्यास त्याबाबत तक्रार करणे आवश्यक आहे.त्याची जनजागृती सर्वसामान्यपर्यत पोहोचणे आवश्यक आहे.आपली फसवणुक झाल्यानंतर त्यांची तक्रार करणे याची  जाणीव ज्यावेळी होईल त्यावेळी या चळवळीची जनजागृती प्रत्येकापर्यत पोहोचली असे म्हणता येईल. फसवणुक होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.जरी फसवणुक झाली तर योग्य ठिकाणी त्याची तक्रार करणे,त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे.काही वेळेस ग्राहक तक्रार करीत नाही हा चुकीचा प्रकार आहे.आपल्याला शक्य नसेल तर ग्राहक संघटनेच्या माध्यमातुन तक्रार करू शकता.तक्रार केल्यानंतर पाठपुरावा आवश्यक आहे.ग्राहक पंचायत ही संघटना चांगले काम करीत आहे.संघटनेच्या माध्यमातुन ग्राहक चळवळी अधिक वृध्दींगत करण्याचे काम उत्तम प्रकारे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेचे पारितोषीक वितरण करण्यात आले.याशिवाय ग्राहक पंचायत समितीच्या माध्यमातुन देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी ग्राहक पंचायतीच्यावतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना पुस्तिका भेट देण्यात आली.