राडेबाज संस्कृतीची सुरूवात करणाऱ्या राणे समर्थकांना आवरा

सुशांत नाईक यांची मागणी
Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 14, 2023 20:19 PM
views 555  views

देवगड :  देवगड शहरात रूग्णालयात राणे समर्थकांची राडेबाज संस्कृती सर्वांना दिसल्याचे ताजे उदाहरण असतानाच मिलींद माने व नगरसेवीका प्रणाली माने या मुजोर राणे समर्थकांनी एका अल्पवयीन कॉलेज युवकाला बेदम मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सुसंस्कृत देवगडला अशोभनीय असून अशाप्रकारे राडेबाज संस्कृतीची सुरूवात करणाऱ्या मुजोर राणे समर्थकांना पोलीसांनी वेळेच आवर घालवा अन्यथा युवा सेना गप्प बसणार नाही असा इशारा उध्दव बाळासाहेब ठाकरे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे.

एका अल्पवयीन का ॅलेज युवकावर मारहाण केल्याचा घटनेचा युवा सेनेने तीव्र शब्दात निषेध केला. पोलीस ठाण्याला भेट देवून याबाबत योग्य ती कारवाई करावी व मिलींद माने यांनी या गुन्ह्यात वापरलेली गाडी, वस्तू व मोबाईल पोलीसांनी जप्त करावेत अशी मागणी केली आहे. याबाबत गुन्ह दाखल होवूनही ही माहीती पोलीसांनी पत्रकारांपासून का लपवून ठेवली असा सवालही सुशांत नाईक यांनी पोलीसांना विचारला. शांतताप्रिय असलेल्या देवगड शहरात राणेसमर्थकांकडून राडासंस्कृती सुरू झाली असून एका राणेसमर्थक मुजोर कार्यकर्त्यांनी एका अल्पवयीन कॉलेज युवकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेचा युवासेना निषेध करीत आहे असे सुशांत नाईक यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे शीवसेना संपर्क कार्यालयात पत्रकार परीषदेत सांगितलंय. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, नगरसेवक संतोष तारी, बुवा तारी, संतोष दळवी, प्रफुल्ल कणेरकर उपस्थित होते.

देवगड शहरात एका अल्पवयीन कॉलेज युवकाला राणेसमर्थक मिलींद माने यांनी बेदम मारहाण करून त्याला जीवे मारण्याची धमकी दीली. यावेळी त्याची पत्नी नगरसेवीका सौ.प्रणाली माने या देखील उपस्थित होत्या. पती पत्नीने मारहाण करून व्हिडिओही केला. देवगड शहराला अशोभनीय आहे. अल्पवयीन मुलाला मारण्याच्या घटनेचा युवा सेना निषेध करीत आहे. माजी आमदार आप्पासाहेब गोपटे सुसंस्कृत आहे. मात्र भाजपामध्ये राणे परीवार दाखल झाल्याने भाजपाची सुसंस्कृत संस्कृती बाजुला पडली असून राडेबाज संस्कृती आली आहे. देवगडमध्ये राडासंस्कृती कोणी आणली हे सर्वांनाच माहीत आहे. देवगड ग्रामीण रूग्णालयातील प्रकार याच राडा संस्कृतीमुळे झाला.

 आधीसुध्दा नगरसेवीका सौ.प्रणाली माने यांनी आनंदवाडी येथे एकाला धमकी दिली. याची क्लीप व्हायरल झाली होती. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे. रूग्णालयात झालेल्या घटनेनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत पोलीसांवर दबाव आहे. शिवसेनेने पोलीसांना दिलेल्या अर्जावर कारवाई पोलीसांनी केली नाही तर पुन्हा पोलीस अधीक्षकांकडे जाणार असा इशारा सुशांत नाईक यांनी दिली.