
सावंतवाडी : नवयुवक कला क्रीडा मंडळ, सोनुर्ली-पाक्याचीवाडी यांच्या वतीने २१ आणि २२ मार्च रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शनिवार, दि. २१ मार्च रोजी रात्री ९:०० वाजता सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, आवेरा यांचा 'श्री क्षेत्र गाणगापूर' हा भव्य दशावतारी नाट्यप्रयोग पार पडणार आहे.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार, दि. २२ मार्च रोजी रात्री ८:०० वाजता महिलांसाठी खास 'खेळ पैठणीचा' हा मनोरंजनात्मक कार्यक्रम रंगणार आहे. त्याचप्रमाणे, जागतिक कीर्तीचे महान जादूगार वैभवकुमार यांचा 'धमाल जादूचा प्रयोग' आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मॅजिक, म्युझिक, गेम शो आणि कराओके सिंगिंग ऑर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. हे सर्व कार्यक्रम सोनुर्ली हायस्कूल जवळ, पाक्याचीवाडी-सोनुर्ली येथे पार पडणार आहेत.
या दोन्ही दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांचा लाभ सर्व कलाप्रेमी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन 'नवयुवक कला क्रीडा मंडळ' सोनुर्ली यांच्या वतीने करण्यात आले आहे.










