
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील विविध संघटना एकत्र येत तालुक्यात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच भवन निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला असून संबोधी बहुउद्देशीय तालुका संस्था दोडामार्ग स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर दोडामार्ग तालुका जयंती उत्सव समिती स्थापन करून अध्यक्षपदी अंकुश जाधव यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भव्य दिव्य स्वरूपात साजरी केली जाणार आहे.
विश्व भूषण,बोधिसत्व ,भारतरत्न -डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महा मानवाच्या बुध्द,धम्म आणि संघ या त्रिसुत्रिप्रमाणे,तसेच शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्यांच्या शिकवणी प्रमाणे आपण कार्यरत राहून त्यांच्या विचारांना प्रमाण मानून दोडामार्ग तालुक्यात त्यांच्या विचारांच्या अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक,साहित्यिक व राजकीय संघटना कार्यरत आहेत,यां संघटनांमध्ये कार्यरत पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, अभ्यासक,जाणकर,अनुभवी,सूज्ञ,चळवळीतील जेष्ठ,तरूण पिढीतील सुशिक्षीत युवक आणि महिला या सर्वांची एकत्र बैठक घेऊन समाजाला अपेक्षित असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्याच्या दृष्टीने योग्य ते प्रयत्न व्हायला हवे, अशी उदात्त भावना मनात ठेवून “संबोधी बहुउद्देशीय तालुका संस्था दोडामार्ग” स्थापन करण्यात आली आहे.
संबोधी बहुउद्देशीय तालुका संस्था दोडामार्ग या संस्थेच्या वतीने यावर्षी दोडामार्ग तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात रविवार १५ मार्च २०२६ रोजी स्नेह आपर्टमेंट बिल्डिंग दोडामार्ग याठीकाणी बैठक संस्थेचे अध्यक्ष शंकर मधुकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बुध्दभूषण हेवाळकर, लक्ष्मण आयनडेकर, प्रकाश कांबळे,सिताराम तानू जाधव, सचिव संदीप जाधव, सहसचिव सदाशिव आयनोडकर,श्रीधर जाधव, केशव आयनोडकर, ज्योती जाधव, प्रगती कांबळे,सल्लागार रमाकांत जाधव, अंकुश जाधव,हिशोब तपासाणीस हरिश्चंद्र मणेरकर, विठ्ठल घोटगेकर, सदस्य गणपत कांबळे, संतोष जाधव गुरूदास जाधव सखाराम कदम, भगवान जाधव, जागृती सासोलकर, शंकर लक्ष्मण जाधव, दीपक जाधव, विनोद कदम, नकुळ कांबळे, सुजित कांबळे, चंद्रकांत जाधव, विलास कदम, अर्जुन कदम, उदय जाधव, मनोहर जाधव सह आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य या सर्वांच्या एकमताने निर्णय घेत यावर्षीदोडामार्ग तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरुपात साजरी करण्याचा एकमताने निर्णय घेत या संस्थेच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर दोडामार्ग तालुका जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदि अंकुश जाधव यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष भगवान जाधव, ज्योती जाधव, विठ्ठल घोटगेकर,गुरूदास जाधव विनोद कदम, प्रकाश कांबळे, सचिव दीपक जाधव सहसचिव सीताराम जाधव, सदाशिव आयनोडकर,सखाराम कदम,खजिनदार संतोष जाधव, सहखजिनदार केशव आयनोडकर, सदस्य गणपत कांबळे,जागृती सासोलकर, प्रगती कांबळे अशा प्रकारे जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि आणि सदस्य यांनी सर्वांचे अभिनंदन केले.











