
सावंतवाडी : नवसरणी येथे आज दुपारी तीनच्या दरम्यान दोघा मित्रांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये आनंद भोसले (वय 48 रा. कोल्हापूर) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची कल्पना पॅनर परेरा यांनी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना देताच ते घटनास्थळी पोहोचले. तेव्हा रक्त बंबाळ झालेल्या माणसाला त्यांनी स्वतःच्या मोटरसायकलवर बसून तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या तरुणावर उपचार सुरू आहेत. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम पॅनर परेरा यांनी सहकार्य केले.











