सैनिक पतसंस्थेच्या 'सांस्कृतिक कला महोत्सवा'चा शुभारंभ !

'सहकार'च काढू शकत रोजगारावर तोडगा : मनीष दळवी
Edited by: विनायक गांवस
Published on: February 17, 2024 08:11 AM
views 169  views

सावंतवाडी : सैनिक पतसंस्थेच्या ३३ वर्षांची वाटचाल दैदिप्यमान अशी आहे. सहकार क्षेत्रात मोठ योगदान या पतसंस्थेनं दिलं आहे. सैनिक आणि सैनिक पतसंस्थेसाठी 'आऊट ऑफ दी वे' कितीही जाव लागलं तरी आम्ही जावू, दोनशे कोटींच उद्दिष्ट गाठणारी ही पतसंस्था नक्कीच हजार कोटींच उद्दिष्ट गाठेल असा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केला. तर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या रोजगाराच्या प्रश्नावर तोडगा काढायचा असेल तर सहकार क्षेत्र बळकट करावं लागेल असं विधान त्यांनी केल. सैनिक पतसंस्थेच्या माध्यमातून आयोजित 'सांस्कृतिक कला महोत्सवात' ते बोलत होते‌. त्यांच्या हस्ते या महोत्सवाचा शानदार शुभारंभ करण्यात आला.


याप्रसंगी ते म्हणाले,  सैनिक पतसंस्थेच सहकार क्षेत्रात मोठ योगदान आहे. सैनिक आणि सैनिक पतसंस्थेसाठी 'आऊट ऑफ दी वे' कितीही जाव लागलं तरी आमची तयारी आहे‌. कारण, आमचा विश्वास या पतसंस्थेवर आहे.‌ ही पतसंस्था देशासाठी लढणाऱ्या सैनिकांची आहे. म्हणूनच आज दोनशे कोटींच उद्दिष्ट गाठण्याच काम त्यांनी केलं असून पाचशे कोटींच उद्दिष्ट ठेवल आहे. परंतू, ही संस्था एक हजार कोटींचा टप्पा गाठेल असा मला ठाम विश्वास असल्याचे मत जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केलं. तर ही संस्था केवळ सैनिकांसाठी नाही तर सर्वसामान्य ग्राहकांना देखील प्रोत्साहन देत आहे. विविध योजना पतसंस्था चांगल्या पद्धतीने राबवित आहे. त्यामुळे रोजगारावर तोडगा काढायचा असेल तर सहकार क्षेत्र बळकट करावं लागेल. त्यासाठी शाश्वत काम करावं लागेल असं मत श्री. दळवी यांनी व्यक्त केल. तर सैनिक पतसंस्थेला सदैव खंबीर साथ देणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


सैनिक नागरी पतसंस्था व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कला महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी पार पडला. याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळ्यास प्रारंभ झाला. सुरुवातीला प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू विषद केला. चेअरमन बाबुराव कविटकर यांनी संस्थेच्या ३३ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेच्या यशाचं श्रेय त्यांनी सैनिक, पतसंस्थेचे कर्मचारी व ग्राहकांना दिल. 


याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब म्हणाल्या, सैनिक पतसंस्थेच्या माध्यमातून होणारा हा कार्यक्रम नॅशनल बँकेंपेक्षा कमी नाही. पतसंस्था सहकार क्षेत्रात करत असलेल्या कामाच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. महिलांचा सन्मान करणारी ही एक संस्था आहे. त्यामुळे ही संस्था कधीच मागे राहणार आहे. उत्तरोत्तर या संस्थेच नावलौकिक उंचावत जाईल. देशासाठी लढणाऱ्यांची ही संस्था आहे असं मत अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले. तर, सावंतवाडीची ओळख सांस्कृतिक राजधानी अशी आहे. या ठिकाणी सैनिक पतसंस्थेच्या माध्यमातून दरवर्षी सांस्कृतिक मेजवानी दिली जाते. सहकारात सैनिक पतसंस्थेन विश्वासार्हता जपण्याच काम केलं. अनेकांना रोजगार दिले, लोकांचे संसार उभ करण्याच काम केलं. लोकप्रतिनिधींना जमलं नाही ते पतसंस्था करत आहे असं मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.


याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब,सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ, कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, माजी नगरसेवक सुनील भोगटे, मालवणी कवी दादा मडकईकर, सुप्रसिद्ध गायक धनंजय जोशी, सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक निलेश मेस्त्री, तबला वादक किशोर सावंत, तातोबा गवस, पी.टी.परब, कॅप्टन दीनानाथ सावंत, कॅप्टन सुभाष सावंत, शामसुंदर सावंत, प्रा.जी.ए.बुवा, चंद्रशेखर जोशी, सावंतवाडी पतपेढीचे चेअरमन रमेश बोंद्रे, व्हा.चेअरमन संजू शिरोडकर, दीपक राऊळ, वैभव केंकरे, भरत गावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. संजय कात्रे, प्रास्ताविक सुनिल राऊळ तर आभार कॅप्टन सुभाष सावंत यांनी मानले. तीन दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक कला महोत्सवाची सांगता रविवारी 'वृश्चिकायन' या ट्रिकसीनयुक्त दशावतार नाट्यप्रयोगान होणार आहे‌.