
कणकवली : रोटरी आणि इनरव्हील क्लब कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत लक्ष्मी विष्णू हॉल, कॉलेज रोड कणकवली येथे एक दिवसीय पाककला प्रशिक्षण होणार आहे. तसेच पाककला स्पर्धा आयोजित केली आहे.
पाककला प्रशिक्षणात गव्हापासून बनवता येणारी बिस्किट, प्रोटिन्स चॉकलेट बार, गुलाब जामुन केक यासारख्या नावीन्यपूर्ण विविध पाककला माहितीसह प्रत्यक्ष करून दाखवल्या जाणार आहेत. त्यानंतर पाककला स्पर्धा संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत होणार आहे. स्पर्धेसाठी आरोग्यदायक पौष्टिक दिवाळी फराळ-कोणताही एक पदार्थ हा विषय असून सहभागी स्पर्धकांनी आपला पदार्थ घरीच तयार आणायचा आहे. स्पर्धा संपल्यावर लगेच परीक्षण होऊन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकास गॅस शेगडी, द्वितीय क्रमांक कुकर, तृतीय क्रमांकास इडलीमेकर, उत्तेजनार्थ एक बक्षीस अशी बक्षिसे आहेत. तरी प्रशिक्षण व स्पर्धेच्या माहितीसाठी दिशा अंधारी, राजश्री रावराणे यांना संपर्क करावा, असे आवाहन रोटरी अध्यक्षा सुप्रिया नलावडे यांनी केले आहे. दिवाळी सणाची पूर्वतयारी म्हणून नावीन्यपूर्ण पाककला शिकण्याची संधी महिलांना मिळणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








