विजयदुर्गवर पर्यटकांची गर्दी..!

Edited by:
Published on: November 19, 2023 18:20 PM
views 178  views

देवगड : सध्या पर्यटकांची वर्दळ विजयदुर्गया ठिकाणी वाढू लागली आहे. दिवाळीनंतर मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यातील पर्यटकांची पावले कोकणातील समुद्र किनाऱ्याकडे वळलेली आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयदुर्ग मध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी झालेली आहे. येथील जग प्रसिद्ध विजयदुर्ग किल्ला या ठिकाणी नोव्हेंबर पासून दररोज देशा विदेशातील मोठ्या संख्येने पर्यटक या किल्ल्याला भेट देत आहेत.तसेच बोटी मधून समुद्र सफारीचा देखील आनंद घेत आहेत. त्यामुळे किनाऱ्यावरील छोट्या मोठ्या व्यवसायिकांसह हॉटेल लॉजिंग वाल्यांची देखील उपजीविका चागल्या प्रकारे चालता आहे.पर्यटकांची रेलचेल आता अशीच पुढे राहणार आहे. दिवाळी पासूनच अनेकांनी पर्यटनासाठी,पर्यटनस्थळे पाहण्यासाठी बाहेर पडणे पसंत केले.त्यामुळे  देवगड येथील या विजयदुर्ग पर्यटन स्थळाच्या ठिकाणी गर्दी वाढलेली दिसून येत आहे.येथील स्वच्छ सागरी किनाऱ्यांसह येथील जलदुर्ग पर्यटकांना भुरळ पाडत आहे.या मुळे विजयदुर्ग येथे प्रचंड गर्दी झाली आहे.

विजयदुर्ग येथील समुद्रकिनारी भागामध्ये खाजगी पर्यटक व्यावसायिक बीच सॅक (पर्यटन कुटिरे)उभारण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत आहेत. तसेच शासनाने ही बीचवर शासकीय जमिनीमध्ये भाडेतत्त्वावर बिच सॅक उभारण्यासाठी खाजगी पर्यटन व्यवसायिकांना पर्यटन विभागाकडून परवानगी मिळाली आहे.त्यामुळे विजयदुर्ग बीचवर कुटिरे उभारण्यासाठी अनेक पर्यटक व्यावसायिक इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेला पर्यटक विजयदुर्ग समुद्र किनारी फिरायला जातो.समुद्र स्नानासह फेरी बोटिंग मधून विजयदुर्ग कील्या भोवती समुद्र सफरीचा आनंद घेतो.तसेच समुद्र किनाऱ्यावर घोडे - उंट सवारी करण्यासाठी सायंकाळी फिरणे  या सर्वाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.तसेच उन्हाच्या कडाक्यामुळे थंड गार लिंबू सरबत पिण्यासाठी सरबत स्टॉल वर पर्यटक धाव घेत आहेत. दिवाळीची सुट्टी 19 नोव्हेंबर पर्यंत असल्यामुळे पर्यटकांचा हा उत्साह अजून दोन दिवस चांगला राहील असे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.