बाल गोपाळ मित्रमंडळाच्‍या महाआरतीसह दीपोत्‍सवाला भाविकांची गर्दी

Edited by:
Published on: January 22, 2024 14:54 PM
views 136  views

सावंतवाडी : अयोध्‍येतील सोहळ्याच्‍या निमित्ताने शहरातील सबनीसवाडा येथील श्री देव महापुरुषाचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी बाल गोपाळ मित्रमंडळाने आयोजित केलेल्‍या महाआरतीसह दीपोत्‍सवाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी फटाक्‍यांची आतषबाजी करण्‍यात आली. जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 

‘जय श्रीराम’ असा श्रीरामाचा जयघोष करत बाल गोपाळ मित्रमंडळातर्फे श्री देव महापुरुषाची पूजा, आरती करण्‍यात आली. यावेळी मंडळाच्‍यावतीने  उपस्थितांना गोड प्रसादाचे वाटप करण्यात आले. उपस्थित रामभक्तानी जल्लोष साजरा केला. 

यावेळी बाल गोपाळ मित्रमंडळाचे विजय चिटणीस, ॲड. बापू गवाणकर, ऋषिकेश वाडकर, अवधूत नाटेकर, समीर सावंत, राजन  नाईक, सुरेंद्र सावंत, प्रसाद वाडकर, साईल वाडकर, बाळा नमशी, विनोद सावंत, संतोष सावंत, आनंद म्‍हापसेकर, चेतन बामणे, श्रीकांत कोरगावकर, दर्शन सावंत, शेखर सावंत, सखाराम गवस, दुर्गेश रेगे आणि ज्‍येष्‍ठ पत्रकार नंदू मोरजकर, लक्ष्‍मण आडाव आदी उपस्‍थित होते.