
दोडामार्ग : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने चा लाभ मिळवण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील लाभार्थ्यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी सुरुवात केली आहे. दोडामार्ग तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र व तहसील आवारात सोमवार व मंगळावरी सकाळपासून हजारोंच्या संख्येने उत्पन्न दाखले काढण्यासाठी महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती
सोमवार व मंगळवार दोन दिवसात एवढे दाखले विकले गेले तर पुढील पंधरा दिवसात आणखीन मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होणार असल्याने प्रशासनावर ताण येण्याची शक्यता आहे.आज योजनेचा लाभ घेण्यासाठी दोडामार्ग तहसील कार्यालयामध्ये बऱ्याच महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्पन्न दाखल्यासाठी आणि झेरॉक्स साठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले या योजनेसाठी प्रामुख्याने उत्पन्नाचा दाखला व वयअधीवास दाखला लागतो. आणि तो काढण्यासाठी गाव पातळीवर ग्रामपंचायत पोलीस पाटील यांच्या रहिवाशी दाखल्याची गरज असते तसेच शहरात नगरपंचायत रहिवासी दाखला देखील लागतो त्यामुळे सर्वच लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय आज या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपली शेती भाती सोडून दाखले गोळा करण्याच्या धावपळीत दिसून येत होते.
स्वतंत्र कक्ष नेमावा : राजन म्हापसेकर
दरम्यान जिल्हापरिषद माजी उपाध्यक्ष राजन म्हापसेकर या ही प्रत्यक्ष परिस्तिथी दोडामार्ग तहसील कार्यालय येथे महिलांची झालेली गर्दी पाहून त्यांनी कोकणसाद वृत्तपत्राला माहीती दिली. ते बोलताना म्हणाले की मुखमांत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक गावांत किंवा दोडामार्ग तहसील कार्यालय येथे स्वतंत्र कक्ष उभारून त्या ठिकाणी कंत्राती पद्धतीवर नेमणूक करून या योजनेचा सर्वांना लाभ द्यावा तसेच या योजनेची मुदतही वाढवावी असे ते म्हणाले.